गावात विविध सार्वजनिक मंडळांची गणेश मंदिरे आहेत. गणेशोस्तव काळात मोठ्या आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो.
गावात पहिले जुने कौलारू मारुतीचे मंदिर होते. परंतु कालांतराने मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला . गावठाणात हे मंदिर असून येथे सकाळी ८.०० वाजता नित्य पूजा होते. हनुमान जयंती गावात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. विशेष म्हणजे त्या दिवशी ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची बगाड यात्रा देखील असते.
हिंजवडीला मोठा वारकरी सांप्रदायिक वारसा आहे. गावात जुने कौलारू मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात नित्य पूजा व हरिपाठ होत असतो. दरवर्षी मंदिरात कोजागिरी पोर्णिमेनंतर काकडा आरती होत असते. राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव मंदिरात साजरा केला जातो
गावात विविध देव-देवतांची मंदिरे आहे. त्यात प्रामुख्याने पंचक्रोशीचे आराध्यदैवत असलेले ग्रामदैवत श्री म्हातोबाचे मंदिर हे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिरावर ह्या मंदिराची रचना आहे. हे मंदिर टेकवडीवर स्थित असून आजूबाजूला टेकडीवर एम.आय.डी.सी. व ग्रामपंचायतीने ह्या ठिकाणी विविध झाडांची लागवड गेली आहे. ह्या झाडीत मोर, लांडोर, विविध पक्षी येथे […]


