ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर

ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर

गावात विविध देव-देवतांची मंदिरे आहे. त्यात प्रामुख्याने  पंचक्रोशीचे  आराध्यदैवत असलेले ग्रामदैवत श्री म्हातोबाचे  मंदिर हे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिरावर ह्या मंदिराची रचना आहे. हे मंदिर टेकवडीवर स्थित असून आजूबाजूला टेकडीवर एम.आय.डी.सी. व ग्रामपंचायतीने  ह्या ठिकाणी विविध झाडांची लागवड गेली आहे. ह्या झाडीत मोर, लांडोर, विविध पक्षी येथे आढळून येतात. मंदिराचे संपूर्ण  काम दगडात केले आहे. गावातील लोक व भाविक दर रविवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. सायंकाळच्या सुमारास पक्षांचा जो किलबिलाट ऐकू येतो तो आवाज मनाला एकदम प्रफुल्लीत करतो गणेश जयंतीच्या आदल्या दिवशी मंदिराचा वर्धापन दिन असतो.तर चैत्र पौर्णिमेला म्हातोबा देवाची बगाड यात्रा असते.मंदिरात दररोज नित्य पूजा होत असते, पहाटे ५.३० वा  व सायंकाळी ७.१५ वा देवाची आरती होत असते.मंदिर परिसरात दत्त महाराजांचे व महादेवाचे मंदिर आहे. व मंदिर पायथ्याला म्हातोबाच्या परम भक्त व पुजारी के श्रीमती राहीबाई रामभाऊ काकडे यांचे समाधी स्थळ आहे

Previous हिंजवडी ग्रामपंचायतेचे अमोनिया मुक्त गाव आरोग्य शिबीर

Leave Your Comment

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत हिंजवडी बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

Our Visitor

001349

ग्रामपंचायत हिंजवडी © 2026. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप