webadmin

ग्रामपंचायत हिंजवडी मार्फत १०% महिलाबाल कल्याण निधी अंतर्गत गावातील महिलांना पीठ गिरणी व शिलाई मशीन लाभाचे चेक देण्यात आले

ग्रामपंचायत हिंजवडी मार्फत १०% महिलाबाल कल्याण निधी अंतर्गत गावातील महिलांना पीठ गिरणी व शिलाई मशीन लाभाचे चेक देण्यात आले

ग्रामपंचायत हिंजवडी मार्फत ५% दिव्यांग निधी अंतर्गत गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला

ग्रामपंचायत हिंजवडी मार्फत ५% दिव्यांग निधी अंतर्गत गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला

गणेश मंदिर  

गावात विविध सार्वजनिक मंडळांची गणेश मंदिरे आहेत. गणेशोस्तव काळात मोठ्या आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो.

हनुमान मंदिर

गावात पहिले जुने कौलारू मारुतीचे मंदिर होते. परंतु कालांतराने  मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला . गावठाणात हे मंदिर असून येथे सकाळी ८.०० वाजता नित्य पूजा होते. हनुमान जयंती गावात मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. विशेष म्हणजे त्या दिवशी ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाची बगाड यात्रा देखील असते.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

हिंजवडीला मोठा वारकरी सांप्रदायिक वारसा आहे. गावात जुने  कौलारू मंदिर होते. त्याचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरात नित्य पूजा व हरिपाठ होत असतो. दरवर्षी मंदिरात कोजागिरी पोर्णिमेनंतर काकडा आरती होत असते. राम जन्मोत्सव, कृष्ण जन्मोत्सव मंदिरात साजरा केला जातो

ग्रामदैवत श्री म्हातोबा मंदिर

गावात विविध देव-देवतांची मंदिरे आहे. त्यात प्रामुख्याने  पंचक्रोशीचे  आराध्यदैवत असलेले ग्रामदैवत श्री म्हातोबाचे  मंदिर हे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरी येथील खंडोबा मंदिरावर ह्या मंदिराची रचना आहे. हे मंदिर टेकवडीवर स्थित असून आजूबाजूला टेकडीवर एम.आय.डी.सी. व ग्रामपंचायतीने  ह्या ठिकाणी विविध झाडांची लागवड गेली आहे. ह्या झाडीत मोर, लांडोर, विविध पक्षी येथे […]

हिंजवडी ग्रामपंचायतेचे अमोनिया मुक्त गाव आरोग्य शिबीर

ग्रामपंचायत हिंजवडीच्या माध्यमातुन अमोनिया मुक्त गाव करण्यासाठी मोफत एच. बी. तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले. या शिबिरामध्ये एच.बी.तपासणी करुन ज्या महिलांनध्ये एच. बी. प्रमाण कमी असणार आहे,त्यांना औषधोपचार करण्यात येणार आहे,यावेळी तसेच मोफत नेत्र तपासणी अंतर्गत चष्मांचे वाटप देखील करण्यात आले.यावेळी गावातील अनेक नागरिक ग्रामस्थ या शिबिराला उपस्थित होते..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून प्रामुख्याने काम करणाऱ्या ग्रामपंचायतीस, कामगिरीनुसार प्रोत्साहित करुन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता, उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्याकरिता “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” हे पुरस्कार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली

ग्रामपंचायत पंचायत हिंजवडी हद्दीतील आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आले

ग्रामपंचायत पंचायत हिंजवडी हद्दीतील आरोग्य उपकेंद्र इमारतीचे लोकार्पण करण्यात आले

शहर बातम्या आणि अद्यतने

नवीनतम ग्रामपंचायत हिंजवडी बातम्या, लेख आणि संसाधने, दर महिन्याला थेट तुमच्या इनबॉक्समध्ये पाठवली जातात.

Our Visitor

000991

ग्रामपंचायत हिंजवडी © 2026. सर्व हक्क राखीव.

Translate »
मुख्यपृष्ठ
दूरध्वनी
तक्रार
कर भरणे
व्हाट्सअप